जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा १०० पार केला असतानाच शुक्रवारी याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन नियमावली जाहीर करून तसे आदेश काढले की, ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार, यात्रा, आंदोलन यासह विविध नियमावली केली. याचे आदेश शुक्रवारी जिल्हाभरातील अधिकारी यांना दिले. पण, आष्टी तालुक्यातील प्रशासन एवढे निगरगट्ट आहे की, ग्रामीण भागात ना मास्क, ना सोशल डिस्टन्स ठेवत मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आठवडी बाजार भरवले गेले. असे असताना याकडे कोणताही अधिकारी फिरकला नाही, की गावचे ग्रामसेवक यांनी तशा सूचना केल्या नाहीत. मग, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असेल तर यावर ते काय निर्णय घेतील, हे पाहणे गरजेच आहे. तालुक्यातील प्रशासनाने सक्रिय होऊन अशा प्रकाराला पायबंध घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केली आहे.
याबाबत आष्टी येथील तहसीलदार राजाभाऊ कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, तालुकास्तरावरील अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. गटविकास अधिकारी यांच्याशी बोलून घेतो, असे लोकमतला सांगितले.
===Photopath===
070321\07bed_1_07032021_14.jpg