शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

'खोक्या'च्या घरात वाळलेले मांस अन् शिकारीचे जाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 11:40 IST

वन विभागाकडून झाडाझडती : हत्यारासह जप्त केले शिकारीसाठी लागणारे इतर साहित्य

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या निराळ्या भोसले याच्या शिरूर येथील घरात दोरीवर वाळत असलेले मांस, शिकारीचे जाळे, सत्तूर यासह इतर साहित्य आढळले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला. खोक्याच्या घरातून सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सतीश भोसले याच्या घरामध्ये शिकार करण्यासाठीचे साहित्य असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी वन विभागाला दिली. त्यानुसार, वन विभागाच्या ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी १०:३० वाजता भोसले याच्या शिरूर येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी दोरीवर वाळत असलेले मांस, तीन वाघुरे, पक्षी पकडण्याचे दोन पिंजरे, एक सत्तूर, एक कत्ती, एक डबा, दोन फासे पिंजरे, दोन पाकिटे असे साहित्य आढळले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

'तो हरीण मारतो अन्...' 

बीड : शिरूरकासार तालुक्यात दहशत निर्माण करण्यासह हरणांची तस्करी करून त्यांची शिकार करणारा खोक्या भोसले हा कुख्यात गुंड आहे. तो हरीण मारून त्याचे मांस एक ते दोन दिवसाला डब्यात घालून भाजपचे आमदार सुरेश धस यांना देतो. खोक्याचा आका सुरेश धस आहेत. त्यामुळे त्यांनाही यात सहआरोपी करावे, अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे यांनी केली.   खोक्या भोसले याचे एका व्यक्तीला अर्धनग्न करून बेदम मारहाण करणे तसेच अनेक कारनाम्यांचे कथित व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. खोक्यावर मकोका लावावा. तसेच यासाठी आपण मंगळवारी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे प्रा. मुंडे यांनी सांगितले.

घरात वाळलेले मांस कोणत्या प्राण्याचे आहे, हे तपासण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येत आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पाटोदाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धस