शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

देवीनिमगाव येथील पाण्याची टाकी बनली धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली सार्वजनिक पाण्याची टाकी आता जुनी झालीे आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली सार्वजनिक पाण्याची टाकी आता जुनी झालीे आहे. ही टाकी जीर्ण झाल्याने कधी पडेल, याचा नेम नाही. या धोकादायक टाकीमुळे अपघाताची शक्यता आहे. तरी ही टाकी पाडून नवीन टाकी बांधावी, अशी मागणी शिवसंग्रामचे धनंजय फिस्के यांनी केली आहे.

आष्टी तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून १९८० मध्ये देवीनिमगाव येथे जीवन प्राधिकरणची पाण्याची टाकी उभारली आहे. या टाकीला ४० वर्षे झाल्याने तिला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे जीर्ण झालेली टाकी धोकादायक बनली आहे. आता याच टाकीत पाणी सोडले जात आहे. पण भविष्यात टाकीची अचानक पडझड झाली तर मोठी घटना घडू शकते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. नसता दुर्दैवी घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे धनंजय फिस्के, भागचंद फालके, रियाज पठाण, योगेश जवणे, विनोद पवणे यांनी सांगितले.

....

काय म्हणतात अधिकारी?

गावाला पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. त्याबाबत पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच पाण्याची नवीन टाकी करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी विद्या विधाते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

....

ग्रामपंचायतीनेच टाकी पाडावी

देवीनिमगाव येथे जीवन प्राधिकरण योजनेची पाण्याची टाकी आहे. या टाकीचे आयुष्यमान संपले आहे. ग्रामपंचायतीने टाकी पाडण्याची परवानगी घेऊन पाडावी. आपण ती कधीच हस्तांतरीत केली आहे. आता ते ग्रामपंचायतीचे काम असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता बी. टी. खेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

===Photopath===

250621\nitin kmble_img-20210625-wa0039_14.jpg