शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बिंदुसरेला पाणी वाढले, कर्पराला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:39 IST

सलग दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तर आहेच, त्याचबरोबर अतिवृष्टीचा धुमाकूळ सुरु आहे. रविवारी शहरातून जाणाºया बिंदुसरा नदीची पाणी पातळी वाढल्याने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देपावसाचा धिंगाणा सुरूच : अनेक ठिकाणी संपर्क तुटला; पंचनामे करणाऱ्या यंत्रणेलाही पावसामुळे अडथळे

बीड : सलग दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तर आहेच, त्याचबरोबर अतिवृष्टीचा धुमाकूळ सुरु आहे. रविवारी शहरातून जाणा-या बिंदुसरा नदीची पाणी पातळी वाढल्याने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे शहराच्या अंकुशनगर भागातील कर्परा नदीलाही पाणी वाढल्याने उद्भवलेल्या पूर सदृष्य स्थितीमुळे या परिसराचा संपर्क तुटला होता. दरम्यान शनिवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर रविवारी धारुर शहराला पुन्हा पावसाने झोडपले.जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारपासून पंचनामे करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी अडथळे आले. बीड शहराला पाणीपुरवठा होणारे बिंदुसरा धरण ओसंडून वाहत आहे. शनिवार आणि रविवारी पाली धरण परिसरातील गावांमध्ये झालेल्या पावसामुळे बीड शहरातून जाणाºया बिंदुसरा नदीच्या पात्रात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पाणी वाढले. नदीलगतच्या पात्रातच रविवारचा बाजार भरला होता. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेकांनी धास्ती घेतली होती. बाभळीची झाडे व झुडुपांमुळे अरुंद पात्रातून वाहणाºया पाण्याची पातळी पुलापासून पाच फूट कमी होती.दरम्यान नगर परिषदेच्या यंत्रणेकडून ध्वनीक्षेपकाद्वारे सावधगिरीचा इशारा देण्यात येत होता, तर पोलीसही वाहतूक सुरळीत करत होते. नदीला वाढलेले पाणी पाहण्यासाठी मुलांसह मोठ्यांनी गर्दी केली होती. पुलावर विक्रीसाठी बसलेल्या आणि बाजारातील विके्रत्यांनीही दुकाने आवरली.कर्पराला दिवसातून दोन वेळा पाणी वाढतेशहरातील अंकुशनगर भागातील कर्परा नदीलाही सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास पाणी वाढले. कपिलमुनी नगर व इतर भागाचा संपर्क तुटला होता. कर्परा नदीला सध्या दररोज दोन वेळा पाणी वाढून पूरसदृष्य स्थिती निर्माण होते. येथील पूल काही वर्षांपासून नादुरुस्त आहे.मध्यभागी खड्डा पडल्यामुळे आणि कठडे वाहून गेल्यामुळे उरलेल्या अरुंद रस्त्यातून वाट काढत नागरिकांना जीव धोक्यात घालून जावे लागते. कर्परा नदीचा पूल व रस्ता पाण्याखाली जाण्याची यंदाच्या पावसाळ्यातील दहावी वेळ असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.बिंदुसरेकाठच्या नागरिकांनी सतर्करहावेबिंदुसरा नदी दुधडी भरु न वाहत आहे. तसेच पुन्हा पाऊस होण्याची शक्यता असून बिंदूसरा नदीपात्राच्या जवळ असलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे. प्रशासनालाही या बाबत खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून शहरी व ग्रामीण भागातील बिंदूसरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.प्रशासनाने उपाय करावेतपाऊसकाळ असल्याने बिंदुसरा धरण, नदी तसेच कपिलधार परिसरात जलसौंदर्य पाहण्यासाठी काही लोक धाडस करतात. मागील घटना लक्षात घेऊन प्रशासनाने उपाय करण्याची गरज आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस