अंबाजोगाई : शासकीय कार्यालयाच्या भिंतींवर ‘येथे थुंकू नये’ अशा सूचना लिहिलेल्या असतात; परंतु त्याच शासकीय कार्यालयातील कर्मचारी व कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते. परिणामी, शासकीय कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच दिसतात. यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पाइपलाइन उखडली; पाण्यासाठी भटकंती
बीड : पानगाव ते धर्मापुरी राष्ट्रीय महामार्ग ३६१ एच रस्त्याचे काम करताना निरपणा ते बाभळगाव पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन उखडल्याने नऊ खेडी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेंतर्गत येणाऱ्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदरील पाइपलाइन दुरुस्तीसाठी संबंधित गुत्तेदार व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. नवीन पाइपलाइन टाकून दिल्यानंतर या योजनेतून सर्व गावांना पाणीपुरवठा होईल, असे शाखा अभियंता श्रीमंत लव्हारे, एमजीपी उपविभाग अंबाजोगाई यांनी सांगितले.