शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बंद पथदिव्यांना सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST

संरक्षक कठड्याची गरज आष्टी : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोरा फाटा दरम्यान रस्त्याच्या वळणावर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक ...

संरक्षक कठड्याची गरज

आष्टी : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोरा फाटा दरम्यान रस्त्याच्या वळणावर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक कठडे तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संरक्षक कठडे तातडीने बांधावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

फवारणीची कामे सुरू

शिरूर कासार : सध्या तालुक्यात पाऊस झाल्याने पिकांवर औषध फवारणीसह तणनाशक फवारणीची कामे सुरू आहेत. मागील दोन आठवडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना आधार झाला आहे. आता पिकांवरील कीड टाळण्यासाठी आवश्यक औषधींची फवारणी शेतकरी करीत आहेत.

राडी-मुडेगाव रस्त्यावर खड्डे

अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी

बीड : नगर परिषदेकडून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमितपणे करण्यात येत आहे. शहराच्या काही भागांत तीन दिवसाआड आणि तेही सात ते आठ तास, तर काही भागांत बारा ते पंधरा दिवसाआड आणि तेही फक्त दीड ते दोन तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.