बीड : लिंबागणेश सर्कलमधील नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद पाठिशी असल्याने संघर्षाची वाटचाल करता आली. लिंबागणेशसह या परिसरातील गावांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असून रस्ते, वीज, जलसिंचन व मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ.संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी, लिंबागणेश, मसेवाडी, मुळुकवाडी येथील विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते.
कोरोनाच्या संकटाने विकास कामांची गती मंदावली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी अधिकचा निधी द्यावा लागला. येत्या काळात लिंबागणेश सर्कलमधील प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे ते म्हणाले.
लिंबागणेश पंचायत समिती गणातील सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी, लिंबागणेश, मसेवाडी, मुळुकवाडी येथील रस्ते सौर पथ दिवे सभागृह आदी विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कोरोनाचे नियम पाळून आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. लिंबागणेश, बोरखेड रस्त्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.
विकास कामांची पाहणी
लिंबागणेश येथील सिमेंट रस्ते, पथ दिवे, गणपती मंदिर परिसरातील विकास कामे, सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी, मसेवाडी, मुळुकवाडी येथीलही रस्ते व इतर विकास कामांची पाहणी करण्यात आली. लिंबागणेश-बोरखेड या रस्त्याचेही लोकार्पण करण्यात आले. काम दर्जेदार झाले असून या रस्त्यावर संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी डॉ.ढवळे यांच्यासह लिंबागणेश ग्रामस्थांनी आ.क्षीरसागर यांच्याकडे केली.
जागेवरच विविध प्रश्न मार्गी
कोरोनाचे नियम पाळत आ. क्षीरसागर लिंबागणेश पंचायत समिती गणातील गावांमध्ये दाखल झाले. ना गर्दी, ना गाजावाजा, थेट लोकांमध्ये जात लोकांचे प्रश्न समजून घेत थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत जागेवरच विविध प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी चांगला पायंडा पाडला आहे.
===Photopath===
040421\042_bed_2_04042021_14.jpg
===Caption===
सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी, लिंबागणेश, मसेवाडी, मुळुकवाडी येथील रस्ते सौर पथ दिवे सभागृह आदी विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी आ. संदीप क्षीरसागर.