शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राखेच्या प्रदूषणाविरुद्ध वडगावचे ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

१२ बीइडीपी २० राखेच्या प्रदूषणामुळे त्रस्त दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले/ १२ बीइडीपी २१ थर्मलचे ...

१२ बीइडीपी २० राखेच्या प्रदूषणामुळे त्रस्त दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले/ १२ बीइडीपी २१ थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

दीड तास रास्ता रोको : परळी थर्मलच्या मुख्य अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन

परळी (जि. बीड) : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दादाहरी वडगाव व दाऊतपूर शिवारातील तळ्यामधील राख व राखसाठ्याच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषण हटाव आणि दादाहरी वडगाव बचाव या मागणीसाठी ग्रामस्थांनी परळी - गंगाखेड राज्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावर दीड तास वाहतूक खोळंबली होती.

परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव, दाऊतपूर शिवारात थर्मलचे राख तळे असून, या तळ्यातून दररोज शेकडो टिप्पर भरून राखेची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक परळी-गंगाखेड रस्त्यावरील दुचाकीसह सर्वच वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. विशेष म्हणजे दादाहरी वडगाव येथील साडेतीन हजार ग्रामस्थांना राखेच्या प्रदूषणाचा अनेक वर्षांपासून त्रास होत आहे. डोळ्यांचे व फुफ्फुसाचे आजार होत आहेत. गेल्या पाच वर्षांत श्वसनाचे गंभीर आजार जडलेले रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राख तळ्यातून होणारी राखेची वाहतूक बंद करावी व दा. वडगाव, दाऊतपूर शिवारात राख साठे उद‌्ध्वस्त करावेत व प्रदूषण मुक्त गाव करावे या मागणीसाठी शुक्रवारी परळी -गंगाखेड रस्त्यावरील दादाहरी वडगाव जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात वडगाव येथील आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राखेचे प्रदूषण हटवा व ग्रामस्थांना वाचवा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी आंदोलकांची भेट घेतली. मुख्य अभियंत्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले. वडगाव परिसरात राखेचे साठे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व राख वाहतुकीमुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले .