शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

खरडगव्हाण येथे कोरोना बाधितांचा गावभर फेरफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असला तरी आष्टी तालुक्यात मात्र आकडा कमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असला तरी आष्टी तालुक्यात मात्र आकडा कमी होताना दिसत नाही. तीन दिवसात खरडगावात ३० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. काही रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर काही महाभाग नियम पायदळी तुडवत गावभर फेरफटका मारत असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. दरम्यान, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पत्राद्वारे सरपंच, ग्रामसेवकांना त्यांनी दिले आहेत.

आष्टी तालुक्यातील खरडगव्हाण गावात मागील तीन दिवसात ३० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आयटीआय येथे १३ तर ग्रामीण रुग्णालयात ६ रुग्ण उपचार घेत आहेत. गुरूवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संस्थात्मक विलगीकरणात शाळेत १ रूग्ण होता. परंतु रेकॉर्डवर ११ रूग्ण आहेत. बाकी १० रुग्णांनी गावभर फेरफटका मारल्याचे उघडकीस आले. या रुग्णामुळे कोरोना पसरवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संस्थात्मक विलगीकरणाच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या रुग्णावर फौजदारी गुन्हे दाखल करावा. कार्यालयास तसा अहवाल सादर करावा. अन्यथा आपणावर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आष्टी तालुक्यात कोरोना आकडा वाढत आहे. नियमाचे पालन करून अंगावर दुखणे काढू नये. लक्षणे दिसताच आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी केले आहे.

....

ग्रामसुरक्षा समिती करतेय काय?

गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली असताना याला प्रतिबंध यावा. त्याचबरोबर रुग्णांना योग्य उपचार मिळावेत. त्याच्यावर लक्ष ठेवावे. त्यांच्यापासून संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामसुरक्षा समिती स्थापन केली आहे. मग कोरोना बाधित रुग्ण गावभर फेरफटका मारून संस्थात्मक विलगीकरणात काय? करत नाहीत. तर ही समिती करेतय काय? असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे.

===Photopath===

250621\nitin kmble_img-20210625-wa0047_14.jpg

===Caption===

खरडगाव येथील  ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस करताना.