बीड : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. तसेच ३५ नवे रूग्ण आढळले असून, २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १७ हजार २८० एवढी झाली आहे. यापैकी १६ हजार ४२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे केवळ १७ नवे रूग्ण आढळल्याने दिलासा मिळाला होता. परंतु, शुक्रवारी पुन्हा नव्या रूग्णांमध्ये वाढ झाली. तसेच तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात बीड शहरातील सहयोग नगर भागातील ५६ वर्षीय पुरूष, केज तालुक्यातील गोटेगाव येथील ८० वर्षीय पुरूष आणि अंबाजोगाई तालुक्यातील ६८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच शुक्रवारी ४१२ कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. यातील ३७७ अहवाल निगेटिव्ह आले तर ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई १०, आष्टी १, बीड १७, धारूर १, केज २, माजलगाव २, परळी २ येथील रूग्णांचा समावेश आहे.
तिघांचा बळी, ३५ नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST