शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी १४ विद्यार्थी रस्टीकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:00 IST

महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपी करताना आढळलेल्या १४ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले.

ठळक मुद्देबारावीची परीक्षा : ९५ केंद्र, ३९ हजार १२२ परीक्षार्थी; पालकांची तोबा गर्दी

बीड : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपी करताना आढळलेल्या १४ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले.जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ३९ हजार १२२ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. पहिला पेपर इंग्रजीचा होता. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उपाय केले असलेतरी केंद्राबाहेर काही ठिकाणी लगतच्या इमारतीवर, छतावर चढून कॉप्या पुरविण्याचे प्रयत्न काही लोक करत होते.परीक्षा नियंत्रणासाठी पाच भरारी पथके तर ८५ बैठे पथक नेमले होते. परीक्षा हॉलमध्ये गाईड, अपेक्षित, पुस्तकांचा वापर करुन कॉपी करणारे विद्यार्थी दिसून आले. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली.आष्टी तालुक्यातील जामगाव येथील निवृत्ती धस कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर २, आष्टी येथील पं. जवारलाल नेहरु कनिष्ठ महाविद्यालय केंद्रावर २ तर भगवान विद्यालय केंद्रावर २ अशा सहा विद्यार्थ्यांवर शिक्षणाधिकारी (मा.) भगवानराव सोनवणे, उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या पथकाने रस्टीकेटची कारवाई केली. बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील गोरक्षनाथ विद्यालय केंद्रावर शिक्षणाधिकारी (प्रा.)राजेश गायकवाड यांच्या पथकाने २ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. शिरुर तालुक्यातील मानुर येथील रेणुका विद्यालय केंद्रावर गटशिक्षणाधिकारी जमीर यांच्या पथकाने २ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तसेच आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालय केंद्रावर २ तर कडा येथील श्रीराम विद्यालय केंद्रावर १ अशा तीन विद्यार्थ्यांवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली. एकूण १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा संनियंत्रण कक्षाचे अधीक्षक राजेश खटावकर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एक. के. गुंड यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा