शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपातून वराच्या बहिणीची पर्स लंपास; दीड लाखाचे दागिने चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मागील महिन्यात शहरातील गुरुवार पेठ भागातील एका मंगलकार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना गॅस सिलेंडरने ...

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : मागील महिन्यात शहरातील गुरुवार पेठ भागातील एका मंगलकार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाल्याची घटना घडली होती. याचाच गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी नवरदेवाच्या बहिणीची पर्स लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख ६६ हजारांचा ऐवज होता. ५ मार्च रोजी याची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.१५ वाजता गुरुवार पेठ भागातील एका मंगल कार्यालयात अश्विन भरतकुमार शर्मा यांच्या बहिणीचा विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. लग्न समारंभ सुरु असताना अचानकच स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि धावपळ सुरु झाली. काही तरुणांनी धाडसाने हे सिलेंडर बाहेर आणत आगीवर नियंत्रण मिळविले. या सर्व गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंगल कार्यालयात प्रवेश करून नवरदेवाची बहीण पायल धीरज शर्मा (रा. कात्रज, पुणे) यांची पर्स लंपास केली.

या पर्समध्ये मोबाईल, सोन्याचे बाजूबंद, बोरमाळ, हार, चांदीचे पैंजण असा एकूण १ लाख ६६ हजाराचा ऐवज होता. रात्री १० वाजता पायल शर्मा यांना पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, सर्वांकडे चौकशी केली पण पर्सबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. अखेर ५ मार्च रोजी अश्विन शर्मा यांनी पर्स चोरीला गेल्याची तक्रार अंबाजोगाई शहर पोलीसात दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.