तालुक्यात रायमोहा येथे ग्रामीण रूग्णालय असून त्या अंतर्गत खालापुरी, शिरूरकासार
असे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र
आहेत. या दोन्ही केंद्रांवर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी शासन आदेशानुसार कर्तव्य बजावताना दिसत आहेत. खालापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली काही वर्षापासून डॉ. विकास आठवले , डॉ. सुहास खाडे , डॉ. विशाल मुळे, डॉ. संजिवनी गव्हाणे सुरळीत आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नात असतात, त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांतून ही चांगला प्रतिसाद मिळतो. वरिष्ठांच्या
मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यासाठी थिगळे, पाखरे, शेख, नागरगोजे, मिसाळ, श्रीमती बडगे, कपाळे, शेख, सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका समुदाय, आशा कार्यकर्त्यांनी मोलाचे
योगदान दिले असून
सरपंच किरण
परजणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले.
खालापुरी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. एकत्रित व एकजुटीने प्रयत्न केल्यास गाव कोरोनामुक्त होईल असा विश्वास डाॅ. सुहास खाडे व डॉ. विशाल मुळे यांनी व्यक्त केला. .
===Photopath===
290521\vijaykumar gadekar_img-20210529-wa0024_14.jpg