लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुर्मे, तसेच डॉ. वैभव डूबे, डॉ.आर्शद शेख, सहाय्यक अधिसेविका नीता मगरे, अधिपरिचारिका सुप्रिया गुंडरे, रितिका गोडाम, ज्योती आंधळे, शिवाजी मुसळे, शामल गीते व इतर कर्मचारी मेहनत घेत आहेत.
कोरोना आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. दुपारी लस घेतल्यानंतर आपल्याला कुठलाही त्रास झाला नाही. नागरिकांनी लस घ्यावी असे शीतल पोकरणा यांनी लोकमतला सांगितले. लस घेतल्यानंतर ही नागरिकांनी चेहऱ्यावर मास्कचा वापर,हात वारंवार धुणे , शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
===Photopath===
020421\02bed_3_02042021_14.jpg