शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आगामी नगर परिषद शिवसेना स्वबळावर लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : आगामी नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील मग तो महाविकास आघाडीचा असेल ...

अंबाजोगाई : आगामी नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील मग तो महाविकास आघाडीचा असेल किंवा स्वबळाचा त्याप्रमाणे निवडणुका लढण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले.

अंबाजोगाई येथे नगर परिषद निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची आढावा बैठक सरकारी विश्रामगृहात झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, रामराजे सोळंके, तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा संघटक अशोक गाढवे, लक्ष्मण सोळुंके आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आप्पासाहेब जाधव म्हणाले, आगामी निवडणुकीत अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणावर आपले पदाधिकारी शिवसैनिक निवडून आणण्यासाठी सर्व गट तट सोडून कामाला लागा. मी स्वतः या ठिकाणी ठाण मांडून बसणार असून तन-मन-धनाने ही निवडणूक आपण लढाई लढणार आहोत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशहर प्रमुख गणेश जाधव, शिवकांत कदम, शहर समन्वयक अर्जुन जाधव, नागेश सावंत, उपतालुकाप्रमुख वसंत माने, नाथराव मुंडे, नागेश कुंभार बळी तात्या गंगणे, विनोद पोखरकर, हनुमंत हावळे, विशाल कुलकर्णी, अक्षय भुमकर समाधान पिसाळ अभिमानी वैष्णव प्रवीण मोरे प्रशांत शिंदे सुधाकर काचरे, पाटील फड यांच्यासह शिवसेना, युवा सेना, विद्यार्थी सेना, महिला आघाडी, ऑटो युनियनचे सर्व आजी, माजी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन मुडेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन वैभव कुलकर्णी यांनी केले. अक्षय भुमकर यांनी आभार मानले.

020921\1557-img-20210902-wa0050.jpg

शिवसेनेची अंबाजोगाई मध्ये बैठक