शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षित चालकांमुळे अपघात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:26 IST

अप्रशिक्षित आणि मनविचलित करणा-या चालकांमुळेच अपघात होऊन सर्वसामान्यांचा जीव जात आहे. याला सर्वस्वी जबाबदार तपासणी करणारे आटीओ निरीक्षक आणि ट्रॅव्हल्स मालक आहेत, असा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देतपासणी वाहन निरीक्षक, ट्रॅव्हल्स मालकांनाही सहआरोपी करण्याची मागणी

बीड : जिल्ह्यात शेकडो खाजगी बस मुंबई, पुणे, कल्याणसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावतात. परंतु या मार्गावर बस चालविणाºया चालकांना प्रशिक्षणच दिले जात नाही. वारंवार त्यांनाच वाहने चालविण्यास सांगितले जात असल्याने त्यांची मानसिकता चिडचिडी होत आहे. यातूनच अपघाताला निमंत्रण मिळते. अशा अप्रशिक्षित आणि मनविचलित करणा-या चालकांमुळेच अपघात होऊन सर्वसामान्यांचा जीव जात आहे. याला सर्वस्वी जबाबदार तपासणी करणारे आटीओ निरीक्षक आणि ट्रॅव्हल्स मालक आहेत, असा सूर उमटत आहे.

माजलगावहून पुण्याला निघालेल्या स्लीपर कोच ट्रॅव्हल्सला सोमवारी रात्री बीड-परळी राज्य रस्त्यावर अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाला बसवर ताबा मिळविता आला नाही. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली गेली व पलटी झाली. नुकतीच डुलकी लागलेल्या प्रवाशी यामध्ये दबले गेले. सुदैवाने यामध्ये मोठी जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल्सची तपासणी करून नियमानुसार चालतात की नाही, याची खात्री करण्याचे काम आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षकांचे आहे. परंतु ‘निकम्मे’ अधिकारी येथे असल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांना अभय मिळत आहे.

कार्यालयात बसूनच कागदोपत्री तपासण्या केल्या जातात. त्यांची हे दुर्लक्षच अशा अपघातांना निमंत्रण देत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स अपघातात चालक जरी मुख्य आरोपी असलाा तरी आरटीओ कार्यालयातील संबंधित वाहन निरीक्षक व ट्रॅव्हल्समालकाला सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. ट्रॅव्हल्स मालकांवर अप्रशिक्षित चालक ठेवल्याप्रकरणी तर निरीक्षकांवर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून कारवाईची मागणी होत आहे.ट्रॅव्हल्स उलटून एक ठार, १२ जखमीकुप्पा येथे ट्रॅव्हल्स (एमएच २३ डब्ल्यू. ४१०५) उलटून झालेल्या अपघातात शेषेराव कुलकर्णी (लखनगाव जि.उस्मानाबाद ह.मु.पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश धर्मराज कदम, माऊली रामिकशन शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी नरवटे, वैभव दगडू पांढरे, अविनाश कांबळे, सुभाष डाके, दत्ता लक्ष्मण जवदले, अजित बाबासाहेब सोनपसारे सह चार जण जखमी झाले.या सर्वांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व जखमी माजलगाव तालुक्यातील रहिवाशी आहेत. मृताचे नातेवाईक रत्नाकर कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही हा चालक फरार असून लवकरच त्याला अटक केले जाईल, असे तपास अधिकारी फौजदार पी.एस.सोनवणे यांनी सांगितले.