शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चोर समजून बीड जिल्ह्यात दोघांना बेदम मारहाण, मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 07:20 IST

मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात आली असून अनेक गावांतील मुलांना त्यांनी पळवून नेले आहे, या अफवेवर विश्वास ठेवून माजलगाव शहरात व माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली.

बीड : मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात आली असून अनेक गावांतील मुलांना त्यांनी पळवून नेले आहे, या अफवेवर विश्वास ठेवून माजलगाव शहरात व माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जित्तू बाशु ईश्वर (४० रा.तमिळनाडू) यांच्यासह अन्य एका मतीमंद तरूणाला मारहाण झाली आहे. सध्या सोशल मीडियावरून मुले पळविणारी टोळी बीड जिल्ह्यात आल्याची अफवा पसरू लागली आहे. औरंगाबाद, परभणी, जालना नंतर आता बीडमध्येही दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे एक मतीमंद तरूण गावात फिरत असताना काही लोकांनी मुले पळविण्यासाठी आला आहे, असे समजून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नाना तौर व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बुधवारी सकाळी ११च्या सुमारास जित्तु ईश्वर याला पात्रुड येथे मारहाण केली. जित्तू हा गर्दीच्या ठिकाणी उभा होता. काही लोकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी कसलीच खात्री न करता बेदम मारहाण करून ग्रामीण ठाण्यात हजर केले. येथील पोलिसांनी त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात हलविले. त्याची भाषा समजत नसल्याने रात्री उशिरापर्यंत ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.गेवराईतही महिलेला चोपगेवराई शहरातील आठवडी बाजारात एका भोळसर महिलेला मुले धरणारी समजून मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही महिला मुले पकडणारी नसल्याचे तपासाअंती सिद्ध आले. तालुक्यातील अंतरवाली येथे दोन जणांना नागरिकांनी मुले पकडणारे समजून मारहाण केली होती. त्यानंतर सिरसदेवी येथे सहा ते सात मुले पळवून नेली जात असल्याच्या संशयातून जीपला नागरिकांनी अडविले होते. मात्र नंतर त्यात तथ्य आढळले नव्हते.