शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर तरुणीला दोन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

अंबाजोगाई : लग्न जुळवणाऱ्या मॅट्रीमोनिअल वेबसाइटवर झालेली ओळख तालुक्यातील एका डॉक्टर तरुणीस चांगलीच महागात पडली. कस्टममध्ये ...

अंबाजोगाई : लग्न जुळवणाऱ्या मॅट्रीमोनिअल वेबसाइटवर झालेली ओळख तालुक्यातील एका डॉक्टर तरुणीस चांगलीच महागात पडली. कस्टममध्ये अडकलेली बॅग सोडवण्याचा बहाणा करून त्या तरुणीला सायबर भामट्याने १ लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी दोघांवर शहर ठाण्यात २५ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील एक डॉक्टर तरुणी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. तिच्या फिर्यादीनुसार, यावर्षी जून महिन्यात तिची एका मॅट्रीमोनिअल वेबसाइटवर राहुल चांदेकर याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघात मैत्री झाली व व्हाॅटस्ॲपवर मेसेज सुरू झाले. १ जुलै रोजी राहुलने तिला कॉल केला आणि तो लंडनला असून, काही दिवसांत मुंबईला स्थायिक होणार असल्याचे सांगितले; परंतु माझी एक लगेज बॅग दिल्ली विमानतळावर कस्टमचे पैसे न भरल्याने अडकली आहे, ती बॅग तू पैसे भरून सोडवून घे आणि तुझ्याकडे ठेव, मी आल्यावर घेतो, अशी बतावणी राहुलने केली. थोड्याच वेळात एका मोबाइलवरून त्या तरुणीला कॉल आला आणि समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने दिल्लीच्या कस्टम ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून तिला पैसे भरण्यासाठी बँकेचा खाते क्रमांक दिला. या सर्व भूलथापांना बळी पडून त्या तरुणीने विविध व्यवहारांतून एकूण १ लाख ९५ हजार रुपये त्या खात्यावर जमा केले. संशय आल्याने त्या तरुणीने कस्टम डिपार्टमेंटमध्ये चौकशी केली असता अशा कोणत्याही व्यक्तीच्या नावे तिथे बॅग नसल्याचे तिला समजले. त्यानंतरही राहुलने तिला पैसे पाठविण्यासाठी आग्रह धरला; परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आले असल्याने तिने थेट अंबाजोगाई शहर ठाणे गाठून तक्रार नोंदवली. राहुल चांदेकरसह अन्य एका अनोळखी व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.