या गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणा ट्रक, ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर असे मिळून ३५७ वाहनांची यंत्रणा ऊस आणण्याचे काम करीत आहे. सोमवारी ११ जानेवारी रोजी दुसऱ्या टप्प्यातील दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण करून उर्वरित ४.०० लक्ष मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा जोमाने काम करीत आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार अमरसिंह पंडित व संचालक मंडळासह कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक के. एल. क्षीरसागर, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी कामगार, ऊस उत्पादक बागायतदार, ऊस वाहतूक ठेकेदारांनी परिश्रम घेतले. दुसऱ्या टप्प्यातील दोन लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील नोंदीच्या सर्व उसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत कारखाना सुरू ठेवला जाईल. कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना राहणार नाही, याची दखल घेऊ, असे कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने सांगण्यात आले.
जय भवानी साखर कारखान्याकडून दोन लाख मे. टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST