शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दोन लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:25 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार बीड जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत जारी झालेल्या तीन ग्रीनलिस्टनुसार ८९ हजार शेतक-यांना ४३० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यानंतर ७८ कोटी रुपये मंजूर झाले. तरीदेखील अद्याप २ लाखाहून जास्त शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ५०८ कोटी रुपयांची कर्जमाफी, रक्कमही प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत जारी झालेल्या तीन ग्रीनलिस्टनुसार ८९ हजार शेतक-यांना ४३० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यानंतर ७८ कोटी रुपये मंजूर झाले. तरीदेखील अद्याप २ लाखाहून जास्त शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.

शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर शासन निर्णयानुसार निकषपात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. आवश्यक माहिती बॅँकांनी शासनाकडे पाठविली. निकषानुसार पात्र ठरलेली शेतकरी संख्या ३ लाख ७ हजार ६४ इतकी निश्चित झाली. ६ डिसेंबरपर्यंतच्या तीन टप्प्यात ८९ हजार २८३ शेतकºयांना ४३० कोटी ५० लाख रुपये कर्जमाफी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ४० हजार १८८ शेतकºयांचा समावेश होता. तर उर्वरित शेतकरी इतर राष्टÑीयकृत बॅँकांचे कर्जदार आहेत.

दरम्यान ११ डिसेंबरपर्यंत ४६२ कोटी १५ लाख रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेले असून ७५ हजार ९०९ शेतकºयांच्या बॅँक खात्यात ३३४ कोटी ४७ लाख रुपये जमा झाले. त्यानंतर ७८ कोटी रुपये आणखी मंजूर झाल्याचे समजते. आतापर्यंत ५०८ कोटी रुपये कर्जमाफीपोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.३८० कोटी रुपयांचे वाटपछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना ५०८ कोटी रुपये मंजूर झाले असून ३८० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ही रक्कम पात्र शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही संबंधित बॅँकांकडून सुरु आहे.- विजय चव्हाणव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅँक, बीड.

पात्र शेतक-यांचे सर्व निकषतपासण्याच्या सूचना शासनस्तरावर वारंवार मिळत असून बॅँकांना सर्व माहिती अपलोड करण्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व राष्टÑीयकृत बॅँका व जिल्हा बॅँकेचे लेखापरिक्षण पूर्ण झालेले असल्याने बॅँकांकडूनही माहिती पोहचविली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘पाचव्या ग्रीनलिस्ट’कडे शेतक-यांचे लक्षदरम्यान या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करणे, नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.प्रोत्साहन योजनेसाठी जिल्हा बॅँकेचे ३५ हजार सभासद पात्र असून हा निधी ९२ लाखांपर्यंत असल्याचे सुत्रांनी सांगितले.कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत संथ होत आहे तर ही प्रक्रिया गतीने करण्यासाठी शासनाकडून वारंवार सूचना मिळत आहेत.अद्यापही २ लाखाहून जास्त शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. पाचव्या ग्रीनलिस्टची ते वाट पाहत आहेत.