शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दोन जीपची समोरासमोर धडक; दीर-भावजय जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:39 IST

बीड : तापाने फणफणलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन दवाखान्यात निघालेल्या जीपला मालवाहू जीपने समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण ...

बीड : तापाने फणफणलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन दवाखान्यात निघालेल्या जीपला मालवाहू जीपने समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दीर-भावजय जागीच ठार झाले, तर दोन वर्षांच्या बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले. बीड-परळी मार्गावरील जरूड फाट्यावर १४ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

रवि नागोराव मिटकर (२६), सोनाली माधव मिटकर (३०) अशी मयत दीर-भावजयीची नावे आहेत. चालक विशाल अर्जुन मिटकर (२७) हा जखमी असून गौरव माधव मिटकर (२) आणि माधव नागोराव मिटकर (३५) हे थोडक्यात वाचले. घाटसावळी तांडा (ता.बीड) येथील रहिवासी असलेल्या मिटकर कुटुंबातील गौरवला रात्री ताप आला. त्यामुळे पहाटे ३ वाजता त्याला घेऊन कुटुंबीय बीडकडे जीपमधून (एमएच ०६ एएस - ०४६७) निघाले होते, तर भूम (जि. उस्मानाबाद) येथून परळीकडे भाजीपाला घेऊन मालवाहू जीप (एमएच २५ एजे- ३४०३) जात होती. बीड-परळी मार्गावर जरूड फाट्यानजीक मालवाहू जीपचालकाचा ताबा सुटला आणि समोरासमोर जोराची धडक झाली. यानंतर जीप शंभर दीडशे मीटरवर जाऊन उलटली. यात रवि मिटकर व सोनाली मिटकर हे जागीच मृत्युमुखी पडले, तर चालक अर्जुन मिटकर हा जखमी झाला. गौरव आणि त्याचे वडील माधव हे अपघातानंतर जीपमधून बाहेर झेपावले. त्यामुळे ते सुरक्षित आहेत. अपघातात जीपचा अक्षरशः चुराडा झाला असून मालवाहू जीपचेदेखील नुकसान झाले. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

_

स्थानिकांचे मदतकार्य

दोन जीपची समोरासमोर धडक झाल्यावर मोठा आवाज झाला. या आवाजाने किशोर काकडे व जालिंदर काकडे धावत आले. त्यानंतर दादासाहेब लांडे यांनीदेखील तेथे पोहोचून मदतकार्य केले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठविले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मालवाहू जीपचालकास त्यांनी पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

140921\14_2_bed_12_14092021_14.jpeg

अपघातात जीपचा असा चुराडा झाला होता.