शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दोन केंद्रसंचालक तडकाफडकी हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:38 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत १८ विद्यार्थी रस्टिकेट करण्यात आले. शिरुर येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावरील दहावी आणि बारावीच्या केंद्र संचालकांना परीक्षेच्या कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत १८ विद्यार्थी रस्टिकेट करण्यात आले. शिरुर येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावरील दहावी आणि बारावीच्या केंद्र संचालकांना परीक्षेच्या कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आले आहे.

मंगळवारी बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाची परीक्षा होती. शिरुर कासार येथील कालिकादेवी विद्यालय परीक्षा केंद्रावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या पथकाने तपासणी केली असता कॉपी बाळगणाºया १५ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. तर बीड तालुक्यातील चौसाळा येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर उपशिक्षणाधिकारी नजमा यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला भरारी पथकाने ३ परीक्षार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली.मुख्याध्यापकांवरही कारवाईची टांगती तलवारशिरुर कसार येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर पाहणीदरम्यान दहावीसाठी एस. बी. सानप तर बारावीसाठी पी. आर. सिरसाट हे केंद्रसंचालक शिक्षक असल्याचे आढळून आले. त्यांना तत्काळ परीक्षेच्या कामकाजातून कमी केले. मुख्याध्यापक हे केंद्र संचालक नसल्याने परीक्षा केंद्रावर पुरेसे नियंत्रण राहू शकत नाही, असे असताना हे काम टाळणाºया मुख्याध्यापक व्ही. जी. काटे यांची केंद्रसंचालक म्हणून तात्काळ नियुक्ती करण्यात आली. ही कार्यवाही माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी केली.

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीतही परीक्षा केंद्र संचालक हे मुख्याध्यापक असावेत अशा सूचना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केल्या होत्या.शिरुर येथील कारवाईनंतर इतर केंद्रांचे संचालक शिक्षक आहेत की, मुख्याध्यापक याची तपासणी सुरु झाली असून केंद्र संचालक पद टाळणाºया मुख्याध्यापकांवरही कारवाईची शक्यता आहे.

महिला पथकाने खाते उघडलेबारावीच्या परीक्षा अंतीम टप्प्यात आहे. या कालावधीत होणा-या गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी नियुक्त महिला विशेष आणि बैठे पथक यांनी कार्यवाही केली नसल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मंगळवारी चौसाळा येथे तीन परीक्षार्थ्यांवर कारवाई झाली.