तालुक्यातील लुखामसला येथील सावत्र आई असलेल्या रेणुका डोमाळे, वैजीनाथ डोमाळे व पांडुरंग डोमाळे यांच्यात जागेच्या कारणावरून वाद होत होते. १ एप्रिल रोजी जागेच्या कारणावरून दोघांमधील वाद उफाळून आला. या वेळी सावत्र आई रेणुका डोमाळे, वैजिनाथ डोमाळे, योगेश डोमाळे यांनी संगनमत करून पांडुरंग भगवान डोमाळे (वय ३८) याला कुऱ्हाडीचे घाव घालून जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग डोमाळे याचा उपचारादरम्यान अंबाजोगाईत मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी मयताची पत्नी उर्मिला यांच्या फिर्यादीवरून रेणुका डोमाळे, वैजिनाथ डोमाळे, योगेश डोमाळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गेवराई ठाण्याचे सपोनि प्रफुल्ल साबळे,पो.कॉ.विठ्ठल देशमुख, जायभाये यांनी शनिवारी दुपारी वैजीनाथ डोमाळे व योगेश डोमाळे या दोघांना अटक केली.
लुखामसला येथील खुनाच्या घटनेतील दोन आरोपी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST