शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कमी भाव देणा-या व्यापा-यांवर कारवाई सुरु होताच तूर खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 16:41 IST

हमीभाव जाहीर झाल्यानंतरही त्यास न जुमानत कमी भावाने तूर खरेदी करणा-या व्यापा-यांची राज्य  शासनाने चौकशी सुरु केली आहे. यावर सुरुवातीस  डोळेझाक केलेल्या कृषिउत्पन्न बाजार समितीने  आता कारवाईची बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देशासनाने यावर्षी तुरीचा हमीभाव हा 5 हजार 50 रुपये असा जाहीर केला आहे.व्यापारी मात्र हा हमीभाव जाहीर होण्याआधी व नंतरही तुरीस 4 हजारांपेक्षाही कमी भाव देत असत. कमी भावाने तूर खरेदी करणा-या व्यापा-यांची राज्य  शासनाने चौकशी सुरु केली आहे. कारवाईच्या भीतीने व्यापा-यांनी तूर खरेदी बंद केली आहे.

ऑनलाईन लोकमत 

बीड/माजलगाव, दि. २७ :  हमीभाव जाहीर झाल्यानंतरही त्यास न जुमानत कमी भावाने तूर खरेदी करणा-या व्यापा-यांची राज्य  शासनाने चौकशी सुरु केली आहे. यावर सुरुवातीस  डोळेझाक केलेल्या कृषिउत्पन्न बाजार समितीने  आता कारवाईची बडगा उगारला आहे.या कारवाईच्या भीतीने व्यापा-यांनी तूर खरेदी बंद केली आहे. यामुळे जवळपास ३०० पोते तूर पडून आहे.

शासनाने यावर्षी तुरीचा हमीभाव हा 5 हजार 50 रुपये असा जाहीर केला आहे. माजलगाव येथील व्यापारी मात्र हा हमीभाव जाहीर होण्याआधी व नंतरही तुरीस 4 हजारांपेक्षाही कमी भाव देत असत. या बाबत शासनाकडे तक्रारी गेल्यानंतर शासनाने नाफेड आणि फेडरेशन यांच्या मार्फत शासकिय तुर खरेदीला सुरुवात केली. शासकीय तूर खरेदी चालू असताना काही व्यापा-यांनी अडचणीत असलेल्या शेतक-यांची तूर विविध  युक्त्या लढवून कमी भावात खरेदी केली. यानंतर त्यांनी हीच तूर  ज्यादा भावाने खरेदी केंद्रावर विकली व मोठ्या प्रमाणात नफा कमावला. 

या बाबत तक्रार दाखल होताच अशा काही व्यापा-यांची राज्य शासनाकडून सध्या चौकशी चालू आहे. व्यापा-यांनी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 11 हजार 815 क्विंटल तुर खरेदी केली. या तुरीस 3 हजार 700  ते 4 हजार 175 इतका भाव दिला. मार्च नंतर तुरीचे भाव पाडत व्यापा-यांनी 3 हजार ते 3 हजार 500 एवढा कमी भाव दिला. या कमी भावाच्या खरेदीच्या पावत्या बाजार समितीकडे जात असतानाही समितीने यावर कसलाच आक्षेप घेतला नाही. 

व्यापा-यांकडुन खरेदी झालेल्या तुरीच्या या सर्व व्यवहाराची शासनाने माहिती मागवली आहे. यामुळे बाजार समिती आता खबडून जागी झाली व  अशा व्यापा-यांवर कारवाई चा बडगा उगारत आहे. या कारवाईनंतर मात्र त्यांनी समितीत आलेली शिल्लक तूर खरेदी करण्यास नकार दिला आहे.  शेतक-यांची जवळपास 300 क्विंटल तूर अजून पडून असून व्यापारी ही तूर खरेदी करण्यास नकार देत आहेत. व्यापा-यांवर काही कारवाई होणे दूरच पण तूर शिल्लक राहिल्याने शेतक-यांचे मात्र नुकसान होत आहे. 

कोणावर होणार कारवाई व्यापारी खरेदी करीत असलेल्या तुरीच्या भावाची संपुर्ण माहिती ही बाजार समितीला माहित असते. तसेच दररोज कर्मचारी देखील मालाचे बिट चालु असतांना हजर असतात. मग शेतक-यांची एवढया मोठया प्रमाणात लुट चालु असतांना बाजार समितीचे कर्मचारी काय करीत होते ? आता व्यापा-यांवर कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. मात्र, खरेदीच्या वेळी बाजार समितीचे कर्मचारी देखील हजर असत यामुळे त्यांच्यावरहि कारवाई होणार का असा सवाल शेतकरी करत आहेत.  

दोषींवर कारवाई करणार कमी भावाने तूर खरेदी बाबत शासनाच्या आदेशावरुन चौकशी सुरु आहे.  यात कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. यासोबतच बाजारातील विक्री न झालेल्या तुरी बाबत लवकरच तोडगा काढु. - अशोक डक, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, माजलगाव