वडवणी : कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन, आरोग्य प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शहरातील, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी तालुका आरोग्य, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जबाबदारीतून लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यसेवा लातूरचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी केले.
गुरुवारी उपसंचालक डॉ.माले यांनी वडवणी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राची भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.उमेश करमाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालासाहेब तांदळे, डाॅ.अरुण मोराळे यांसह आरोग्यसेवक, सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.माले यांनी लसीकरण विभागाला भेट देऊन, कोविड लसीकरणाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता व उपलब्ध सुविधांचा आढावा घेत, आगामी काळात कोविडबाबत योग्य त्या उपाययोजनांवर भर देण्यासाठी सूचना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येकास सेवा चांगली द्या, असेही डाॅ.एकनाथ माले यांनी सांगितले.
010721\15212603rameswar lange_img-20210701-wa0011_14.jpg