शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शासनाविरुद्ध रणशिंग फुंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:26 IST

आगामी लोकसभा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील होणाऱ्या विजयी संकल्प सभांचा शुभारंभ उद्या सोमवारी बीड येथून होत आहे. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार हे राज्य आणि केंद्र शासनाविरुद्ध रणशिंग फुंकतील.

ठळक मुद्देआज विजयी संकल्प सभा : राज्यातील संपर्क अभियानाचा शरद पवार यांच्या हस्ते होणार बीडमधून शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आगामी लोकसभा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील होणाऱ्या विजयी संकल्प सभांचा शुभारंभ उद्या सोमवारी बीड येथून होत आहे. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार हे राज्य आणि केंद्र शासनाविरुद्ध रणशिंग फुंकतील.बीडच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, हजारोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरिसंह पंडित, जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, युवक नेते संदीप क्षीरसागर माजी आ.उषाताई दराडे, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ.राजेंद्र जगताप, युवक नेते अक्षय मुंदडा, बाळासाहेब आजबे काका, महेंद्र गर्जे आदींनी केले आहे.येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर असलेल्या बागलानी ईस्टेट येथे ही विजयी संकल्प सभा उद्या १ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील.या सभेसाठी पवार यांचे रविवारी सायंकाळी बीड शहरात आगमन झाले. १५ दिवसांपासून सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. तब्बल ३ वर्षानंतर पवार हे बीड जिल्ह्यात येत असल्याने ते काय बोलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यास अधिक महत्त्व आहे.

टॅग्स :BeedबीडSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण