: कृषी महाविद्यालयात जागतिक वनदिन साजरा
अंबाजोगाई :
कृषी महाविद्यालय अंबाजोगाई अंतर्गत, राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने जागतिक वनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून वृक्षमित्र सुधाकर देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष डॉ. प्रताप नाळवंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावळी वृक्षमित्र सुधाकर देशमुख म्हणाले, ‘आपण केलेल्या कामाचे इतरांनी केलेल्या कौतुकामुळे आपल्याला अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते. मी खाल्लेल्या फळांच्या बिया खिशात ठेवून त्या वैराण व ओसाड माळरानावर लावल्या व त्यातूनच वनराई फुलत गेली. मला उत्तरोत्तर झाडांशी लळा लागत गेला व झाडांशी मी एकरूप झालो. आता मला झाडांची पाने, फुले व फांद्या या माझेच अवयव वाटतात.’ प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, वनक्षेत्र वृद्धी करून, त्याचे संवर्धन योग्य पद्धतीने होणे आवश्यक असून, त्यातूनच अखंड प्राणवायू स्रोत निर्मिती होते. वृक्षांच्या विविध प्रजातीबरोबरच गुणात्मक दर्जा विकसित करण्यात कृषी स्नातकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करावे. वृक्षसंवर्धनातून पर्यावरण जनजागृती चळवळ अभिप्रेत आहे. वृक्षवल्ली हेच खरे परममित्र असून, झाडांशी प्रत्येकाने जिव्हाळ्याचे नाते जोडले पाहिजे. प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डाॅ. बसवलिंगाप्पा कलालबंडी यांनी केले. सूत्रसंचालन राजेश रेवले यांनी केले. डाॅ. दीपक लोखंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. नरेंद्र कांबळे, डाॅ. नरेशकुमार जायेवार, डाॅ. योगेश वाघमारे, सय्यद इरफान, स्वप्निल शिल्लार, प्रकाश मुजमुले यांनी परिश्रम घेतले.
प्रमाणित नसले तरी प्रामाणिक राहा
झाडे लावणारा माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. ज्या झाडांमुळे आपण श्वास घेतो ती झाडे आपण अखेरच्या श्वासापर्यंत लावली, जगवली आणि जपली पाहिजेत. आईनंतर झाडांनीच मला जगवले, त्यामुळे झाडेच माझे खऱ्या अर्थाने पालक आहेत, असे भावोद्गारही यांनी काढले. 'झाडांसाठी जगणे आणि झाडांसाठी मरणे ' हेच माझे ध्येय आहे. माणसाने प्रमाणित नसले तरी चालेल; पण प्रामाणिक असले पाहिजे, असे वृक्षमित्र सुधाकर देशमुख यावेळी म्हणाले.
===Photopath===
220321\img-20210321-wa0104_14.jpg