शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

एरंडीच्या बिया खाल्ल्याने हिवरगव्हाणच्या ९ मुलांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:05 IST

रविवारी शाळेला सुट्टी असल्याने क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलांनी शेंगदाणे समजून एरंडीच्या बिया खाल्या. यामुळे ९ मुलांना त्रास सुरू झाला.

बीड : रविवारी शाळेला सुट्टी असल्याने क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलांनी शेंगदाणे समजून एरंडीच्या बिया खाल्या. यामुळे ९ मुलांना त्रास सुरू झाला. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वडवणी तालुक्यातील हिवरगव्हाण येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली.रोहन लक्ष्मण नखाते (१५), अभिषेक अनुरथ नाईकवाडे (११), अजय रतन नाईकवाडे (१५), जयराम जालिंदर गायकवाड (१४), चैतन्य ज्ञानोबा नाईकवाडे (१३), मकरध्वज हनुमान नाईकवाडे (१५), रावसाहेब अंगद शिनगारे (१५), धर्मराज हनुमान नाईकवाडे (१२) व शुभम हनुमान नाईकवाडे (१२) अशी रूग्णालयात दाखल असलेल्या मुलांची नावे आहेत. रविवारी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे ही मुले गावाजवळीच मैदानावर क्रिकेट खेळायला गेली. एक डाव झाल्यानंतर एका झाडाखाली बसले.याचवेळी एकाने शेंगदाणे समजून एरंडीच्या बिया खाल्या. त्याचे अनुकरण इतरांनीही केले. सायंकाळच्या सुमारास या मुलांना मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. पालकांनी त्यांना तात्काळ वडवणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार करून या सर्वांनाच जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.येथे डॉक्टरांनी सर्वच मुलांवर उपचार केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पुढील काही तास हे सर्व मुले वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असणार असल्याचेही सांगण्यात आले.एफडीएच्या अधिकाऱ्यांनी घेतली धाव४अन्नातून मुलांना विषबाधा झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व ऋषीकेश मरेवार यांना मिळाली. त्यांनी तात्काळ रूग्णालयात धाव घेतली. येथे आल्यानंतर खरा प्रकार समजला. तरीही त्यांनी या सर्वांचे जबाब नोंदविले आहेत. भिसे उशिरापर्यंत रूग्णालयात तळ ठोकून होते.

टॅग्स :Beedबीडfood poisoningअन्नातून विषबाधाhospitalहॉस्पिटल