शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर कासार येथे लाच घेताना तिघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:04 IST

येथील ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडल्याची कारवाई होऊन बारा दिवस होत नाही तोच शिरुरच्या सहायक निबंधक कार्यालयात लाच घेणा-या सहायक निबंधकासह लेखापरीक्षक आणि मुख्य लिपिकाला ८ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

ठळक मुद्देदुसरी घटना : आॅडिट अहवालासाठी लाच

शिरुर : येथील ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडल्याची कारवाई होऊन बारा दिवस होत नाही तोच शिरुरच्या सहायक निबंधक कार्यालयात लाच घेणा-या सहायक निबंधकासह लेखापरीक्षक आणि मुख्य लिपिकाला ८ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.आॅडीटच्या संबंधात झालेल्या तक्रारीच्या चौकशीमध्ये चांगला अहवाल देण्यासाठी शिरुर कासार येथील सहायक निबंधक संजय कारभारी सोनवणे, मुख्य लिपिक तुकाराम कोंडीबा वायबसे आणि लेखा परीक्षक पद्माकर अवधूत कुलकर्णी यांनी २७ नोव्हेंबर रोजी ८ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ डिसेंबर रोजी खात्री केली असता लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे संबंधितांनी मान्य केले होते. त्यानुसार १० डिसेंबर रोजी सहायक निबंधक कार्यालयात सापळा लावण्यात आला.लाच घेताना तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील,अमोल बागलाने, प्रदिप वीर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :BeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक