अंबाजोगाई : भाजप सरकारने देशावर लादलेले तीन काळे कृषी कायदे आणि वाढत्या महागाईचा निषेध करीत शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ मार्चच्या 'भारत बंद' मध्ये काँग्रेसने सहभाग नोंदविल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत २६ मार्च रोजी सहकार भवन हॉल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ मार्चच्या 'भारत बंद' मध्ये काँग्रेसने सहभाग नोंदविला. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमितीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होणार आहे, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहेच, परंतु,नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे. देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष भाजपा विरोधी सर्व राजकीय पक्ष, समविचारी संघटना आणि जनतेला सोबत घेऊन केंद्र सरकारचा हा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाही, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यावेळी म्हणाले.
===Photopath===
260321\avinash mudegaonkar_img-20210326-wa0097_14.jpg