बीड : शहरातील तेलगाव नाका परिसरातून ट्रॅक्टरचोरी गेला होता. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ही कारवाई पेठ बीड पोलिसांनी केली.
शेख सलीम शेख याकूब (रा.तेलगाव नाका बीड) यांचे ट्रॅक्टर (एमेच २३ बी ९८३५) ट्रॉलीसह २५ फेब्रुवारी रोजी रात्री चोरून नेला होता. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी हे झोला (ता. गंगाखरेड, जि.परभणी) येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पेठ बीड पोलिसांच्या डी. बी. पथकाने त्याठिकाणी संशयित आरोपीवर दोन दिवस लक्ष ठेवून आरोपीचे राहते घरी सापळा रचला होता. सदर आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागली असता पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून आरोपी त्यांना अटक केली. यामध्ये गोविंद दिलीप आंधळे, गोविंद तानाजी खटिंग व अजय यादव पाळवदे यांना ३ एप्रिल रोजी अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील ट्रक्टर व ट्रॉली किमती तीन लाख रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई डी. बी. पथकातील पोह सौंदरमल, गुरखुदे, जगताप, दरेकर यांनी केली.
===Photopath===
040421\042_bed_22_04042021_14.jpeg
===Caption===
चोरीच्या ट्रॅक्टरसह २ ओरोपी व पोलीस अधिकारी कर्मचारी दिसत आहेत.