शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बीडची ‘झाडवाली झुंबी’ राज्यात तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्यभरातून आलेली तब्बल चारशे बालनाटके...यातून निवडलेल्या मोजक्याच १४ नाटकातून बीडच्या परिवर्तनाच्या ‘झाडवाली झुंबी’ या ...

ठळक मुद्देराज्य नाट्य स्पर्धा : लेखन, अभियनयाचाही पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्यभरातून आलेली तब्बल चारशे बालनाटके...यातून निवडलेल्या मोजक्याच १४ नाटकातून बीडच्या परिवर्तनाच्या ‘झाडवाली झुंबी’ या बालनाटकाने विविध तीन बक्षिसे पटकावून बीडच्या नाट्यसृष्टीचा झेंडा राज्यात रोवला..!

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे या महसूल विभागात राज्य बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी झाली. त्यात जवळपास चारशे नाटके सहभागी झाली होती, हा एकप्रकारे विक्रमच होता. या सर्व विभागातून सर्वोत्कृष्ट दोन-दोन नाटके निवडून त्याची इचलकरंजी येथे अंतिम फेरी १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान झाली.

यात बीडच्या परिवर्तन प्रतिष्ठानच्या झाडवाली झुंबी या बाल नाटकास सर्वोत्कृष्ट तिसरे बक्षीस मिळाले. तर नाटकाचे लेखक दिग्दर्शक डॉ. सतीश साळुंके यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा तिसरा आणि झुंबीची भूमिका करणाºया श्रद्धा रामराव निर्मळ हिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक मिळाले.प्राथमिक फेरीत हे बालनाट्य औरंगाबाद विभागात पहिले आले होते. या नाटकात कुमारी प्रांजल एरंडे, अंजली कदम सृष्टी शिंदे, साक्षी बायस, राघव राऊत, आर्यन परदेशी, प्रथमेश खडकीकर, यश काळे, सोहम कुळकर्णी, तेजस महाजन यांच्या भूमिका उल्लेखनीय झाल्या.

नाटकास अशोक घोलप यांनी संगीत दिले तर चंद्रकांत काळे यांनी संगीत संकलन केले सुधा साळुंके यांनी वेशभूषा व रंगभूषा केली तर प्रदीप मनोहर यांनी नाटकाचे नेपथ्य केले होते. नाटकास मंगेश रोटे, प्रशांत मुळे व बापू भोसले यांनी सहकार्य केले.