शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

‘त्या’ पाच पोलिसांची चौकशी झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:20 IST

मागील आठवड्यात मोबाईल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाºया टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला होता. परंतु या टोळीसोबत गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधकच्या पाच कर्मचाºयांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग असल्याचे समोर आले होते. या पाच पोलिसांच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी चौकशी सुरू केली आहे.

ठळक मुद्देमोबाईल चोरी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील आठवड्यात मोबाईल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाºया टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला होता. परंतु या टोळीसोबत गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधकच्या पाच कर्मचाºयांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग असल्याचे समोर आले होते. या पाच पोलिसांच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी चौकशी सुरू केली आहे.

गहिनीनाथ मनोहर पाळवदे (बीड), सतीश सुखदेव गायकवाड (रा.हिरवरसिंगा ता.शिरूर), सुभाष अर्जुन गायकवाड (रा. शिरापूर धुमाळ ता. शिरूर), अंकुश विश्वनाथ काळे (रा.विठ्ठलनगर, वृंदावन गार्डनसमोर, एमआयडीसी रोड बीड) या चौघांनी बीडसह नाशिक, अहमनगर जिल्ह्यातून विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरले होते. त्यानंतर पाळवदे मार्फत त्याचे आयएमईआय क्रमांक बदलून ते विक्री केले होते.

ही माहिती काही महिन्यांपूर्वीच एलसीबी व एडीएसच्या काही कर्मचाºयांना होती. परंतु त्यांनी याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळेच त्यांचा विश्वास बळावला आणि त्यांनी अनेकांचे मोबाईल चोरले होते. ही माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या कानावर जाताच त्यांनी तात्काळ या कर्मचाºयांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे त्यांची चौकशी करीत आहेत.चौकशी सुरू असून लवकरच ती पूर्ण करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल, असे खिरडकर यांनी सांगितले.अखेर सांगितली हकीकतटोळीतील काही आरोपींनी सर्व प्रकार तपासी अधिकाºयांना सांगितल्याचे समजते. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या कर्मचा-यांची नावेही सांगितली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.परंतु या प्रकरणात एलसीबीच्या कर्मचा-यांचा सहभाग नसून केवळ एडीएसच्या कर्मचाºयांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. यात कोण दोषी आणि कोण निर्दाेश, हे मात्र चौकशीनंतरच समोर येईल.