कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत पाण्याविना कोरडेठाक पडलेला हौद. लोकमतमध्ये बातमी येण्या अगोदर, बातमी आल्यानंतर पाण्याने भरलेला हौद.
कडा- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात येणाऱ्या शेतकरी व जनावरांना कसलीच सुविधा उपलब्ध नाही. ‘सुविधांचा दुष्काळ’ या मथळ्याखाली लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशित करताच कडा बाजार समिती आवारातील जनावरांसाठी कोरडेठाक पडलेल्या हौदात बुधवारी पाणी सोडण्यात आले. पण इतर सुविधांचे काय? हा प्रश्न कायम आहे. तो देखिल मार्गी लावावा, असे शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशित करताच गेली अनेक दिवसांपासून कोरडेठाक असलेल्या हौदात पाणी सोडले आहे. जनावरांना पाण्याविना हंबरडा फोडावा लागत होता. आता कोरडेठाक पडलेला हौद पाण्याने भरला होता. पण हौदात पाणी आले हे खरे पण इतर सुविधा देखील लवकरच मार्गी लावाव्यात, अशी मागणी चौधरी यांनी केली.