शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बीडमध्ये मोबाईल चोरून आयएमइआय क्रमांक बदलणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : नाशिक, अहमदनगर, बीड जिल्ह्यातून विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरून आयएमइआय क्रमांक बदलून नंतर त्यांची ...

ठळक मुद्दे२७ मोबाईल हॅन्डसेटसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाशिक, अहमदनगर, बीड जिल्ह्यातून विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरून आयएमइआय क्रमांक बदलून नंतर त्यांची विक्री करणाºया टोळीचा बीड पोलिसांनी पदार्फाश केला. मंगळवारी रात्री बीड शहरातील रहमत नगर भागातील एका घरावर छापा मारून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २७ मोबाईल हॅन्डसेटसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

बीड शहरातील रहमत नगर भागात राहणारा गहिनीनाथ मनोहर पाळवदे हा त्याच्या घरामध्ये संगणकाचा वापर करून चोरीच्या मोबाईलवरील आयएमइआय क्रमांक बदलून त्यावर बनावट क्रमांक टाकत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाली होती. खातरजमा झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास पाळवदेच्या घरावर छापा टाकला असता चोरीच्या मोबाईलवरील आयएमइआय क्रमांक बदलत असताना तो आढळून आला. यावेळी गहिनीनाथकडे चोरीचे मोबाईल घेऊन आलेले आणि त्याला मदत करणारे सतिष सुखदेव गायकवाड (रा.हिरवरसिंगा ता.शिरूर), सुभाष अर्जुन गायकवाड (रा. शिरापुर धुमाळ ता. शिरूर), अंकुश विश्वनाथ काळे (रा.विठ्ठलनगर, वृंदावन गार्डनसमोर, एमआयडीसी रोड बीड) या तिघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी कलम ३७९, ३४, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ४३ (अ), ६६ (ब) अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलूबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, मोहन क्षीरसागर, शेख सलीम, मनोज वाघ, शेख नसीर, प्रसाद कदम, विष्णू चव्हाण, अशोक हंबर्डे, मुकुंद सुस्कर, सिरसाट यांनी केली.सदरील चार आरोपींकडून पोलिसांनी, आयएमइआय क्रमांक बदललेले ६ व इतर २१ असे एकुण २७ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले. मोबाईलचा आयएमइआय क्रमांक बदलण्यासाठी वापरण्यात येणारे संगणक, आॅक्टोपॉस, मरॅकल बॉक्स, सिमकार्ड असलेले राऊटर वायफाय असे एकूण ३ लाख १ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.