राहुल आवारे यांच्या मालकीचे पाटोदा- नगर रोडवर आर.के. मार्ट नावाचे मॉल आहे. रात्री अज्ञात चोरट्यांनी या मॉलचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील एक ते दीड लाख रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे साहित्यही चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी पाटोदा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल ३ जानेवारी रोजी राहुल आवारेंचा विवाह पुण्यात पार पडला; पण त्यांच्या मालकीचे दुकान फोडून लग्नाचा मुहूर्त साधला आहे. सदर दुकानाचे चार- पाच दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर ३ जानेवारी रोजी त्यांचा पुण्यात लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. नेमक्या या दिवसाचे औचित्य साधून चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडले.
कुस्तीपटू राहुल आवारे यांच्या मॉलमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST