शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात १२ डब्ब्यांची पहिली रेल्वे धावणार; नगर ते आष्टी मार्गावर ५ स्टेशन स्वागतासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 12:40 IST

नगर रेल्वे स्टेशनपासून नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी,कडा, आष्टी ही पाच स्टेशन असणार आहेत.

- नितीन कांबळे कडा (बीड ) : जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेली रेल्वे अखेर ४ फेब्रुवारीपासून अहमदनगर ते आष्टीपर्यंत नियमित धावणार आहे. यामुळे नगर ते आष्टी आता दररोज प्रवास करता येणार आहे. ६१ किलोमीटर अंतरावर पाच रेल्वे स्टेशन सर्व सोयीसुविधेसह प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. १२ डब्याची पहिली प्रवाशी रेल्वे धावणार असल्याचे  अहमदनगर रेल्वेचे कनिष्ठ अभियंता श्रीकेश मिना यांनी सांगितले. जिल्ह्यात रेल्वे आली असली तरी पुढे बीड-परळी जाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नगर रेल्वे स्टेशनपासून नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी,कडा, आष्टी ही पाच स्टेशन असणार आहेत. या ६१ किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्गावर दिवसातुन एक वेळा नियमीत रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे  ४  फेब्रुवारी रोजी धावणार असुन चार रेल्वे मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याच्या खासदार डाॅ.प्रितम मुंडे, नगरचे खासदार डाॅ.संजय विखे हे ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत. आष्टी सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागात नियमित रेल्वे धावणार असल्याने व्यापार, उद्योगाला चालना मिळणार आहे. त्याच बरोबर अनेक वर्षापासून रेल्वेने प्रवास करण्याचे आष्टी करांचे स्वप्न देखील साकार होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांत आनंद व्यक्त होताना दिसत आहे.

आष्टी-बीड-परळी हे  रेल्वे काम बाकी ४७ मोठे पुल, ७४ लहान पुल, ५२ रेल्वे ओव्हर ब्रीज, २४ रेल्वे अंडर ब्रीज, १७ स्टेशन इमारतीचे काम बाकी असुन हातोला, बावी, वेताळवाडी या गावात रेल्वे भूसंपादन होऊनही कामाला अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर १८२५ हेक्टर क्षेत्रावरील भूसंपादनाची आवश्यकता असून १६३४ हेक्टर क्षेत्रावरील भूसंपादन पूर्ण झाले आहे. १९१ हेक्टर क्षेत्रावरील भूसंपादन बाकी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकप्रतिनिधींना लक्ष द्यावे लागणारबावी, हातोला,वेताळवाडी या गावातुन रेल्वे जाण्यासाठी जमिनीचे भूसंपादन झाले असले तरी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता आष्टीवरून रेल्वे पुढे जाण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वेAhmednagarअहमदनगरtourismपर्यटन