शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या रोडरोमिओला दहा वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून नंतर तिच्या डोक्यात दगड मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला १५ फेब्रुवारी ...

अंबाजोगाई : आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून नंतर तिच्या डोक्यात दगड मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला १५ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्या.सुप्रिया सापटनेकर यांनी दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.

चार वर्षापूर्वी परळी शहरात ही भयावह घटना घडली होती. सतीश वसंत मंत्रे असे त्या रोडरोमिओचे नाव आहे. आठवीच्या वर्गातील अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली असता वाटेत सतीशने तिची छेड काढून जीवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या पिडीतेने झालेली घटना पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी सतीशच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या सतीशने पीडिता सकाळच्या वेळी शाळेत जाताना तिला वाटेत अडवले. यापूर्वीची घटना तू घरी का सांगितलीस असे म्हणत तिला शिवीगाळ करत चाकूने तिच्या पोटावर वार करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर रोडवर पडलेल्या पिडीतेच्या डोक्यात मारण्यासाठी त्याने मोठा दगड उचलला. परंतु, सतीश दगड मारणार तेवढ्यात तिथे जमा झालेल्या लोकांनी त्याला पकडल्याने पिडीतेचा जीव वाचला. नागरिकांनी पिडीतेला तातडीने रुग्णालयात पाठविल्याने तिच्यावर वेळेत उपचार होऊ शकले. याप्रकरणी सतीश मंत्रे याच्यावर परळी शहर ठाण्यात पोक्सोसह विनयभंग आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरीक्षक डी.बी. काळे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यालयात सादर केले.

या खटल्याची सुनावणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या.सुप्रिया सापटनेकर यांच्या न्यायालयासमोर झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सतीश मंत्रे यास दोषी ठरवून त्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील २५ हजार रुपये पिडीतेस नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अशोक कुलकर्णी यांनी काम पहिले. त्यांना ॲड. डी.डी. लांब आणि ॲड. एन.एस. पुजदेकर व पैरवी चौधर यांनी सहकार्य केले.

वेडाच्या भरात कृत्य केल्याचा बनाव

सदरील हल्ला सतीश मंत्रे याने वेडाच्या भरात केल्याचा बचाव सुनावणी दरम्यान करण्यात आला. परंतु, सतीशला बारावीला चांगले गुण मिळाले आहेत, तो नोकरी करतो, तसेच सोबत दोन मुली असताना त्याने फक्त पिडीतेवरच हल्ला केला. त्यावरून हे कृत्य त्याने जाणूनबुजून केले असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याआधारे न्यायालयाने सतीशचा बचाव फेटाळला आणि त्याला दोषी ठरवले.