शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

प्रभात बुडूख/ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. सुरुवातील ...

प्रभात बुडूख/

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. सुरुवातील चांगला पाऊस झाला आणि हवामान खात्याने देखील चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे पहिल्या एक, दोन पावसानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी व कापूस लागवड केली आहे. आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४७ हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी जवळपास ६ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. हवामान खात्याचा अंदाज होता. यावर्षी चांगला पाऊस पडेल. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडलेल्या पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. जवळपास सर्वच तालुक्यात शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, मागील आठ दिवसात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे काही तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. यावर्षी कापूस पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. तर, सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे, त्यामुळे या काळात सोयाबीनसह उडीद, मूग, बाजरी तूर या पिकांना पावसाची आवश्यकता आहे.

मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे चांगला पाऊस असताना देखील अनेक भागात उगवले नव्हते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले होते. दरम्यान, यावर्षी पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अनेक अडचणींमध्ये असेलल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे. दुबार पेरणी करावी लागली तर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे वरूणराजाची प्रतीक्षा करीत आहे.

...

जिल्ह्यातील सध्याची स्थिती

आतापर्यंत झालेली पेरणी - ६ लाख ४८ हजार हेक्टर

अपेक्षित पाऊस सरासरी १४८.१ मिमी

झालेला पाऊस सरासरी १९०.१ मिमी

...

....तर दुबार पेरणी

खरीप हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची पुढील सर्व आर्थिक गणिते अवलंबून असतात. दरम्यान, यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कापूस यासह इतर खरीप हंगामातील पिकांचा पेरा झाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन व्हावा यासाठी शेतकरी बांधवांनी पोटेशियम नायट्रेटची कृषी सहायकाच्या मार्गदर्शनाने फवारणी कारावी. पाण्याची व्यवस्था ज्यांच्याकडे आहे, त्यांनी स्प्रिंकलरने पिकांना पाणी द्यावे. कृषी सहायकांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

-दत्तात्रय मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड.

,...

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

मागील वर्षी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल्यामुळे दुबार पेरणीचा खर्च वाढला होता. त्याच पद्धतीने जर यावर्षी देखील दुबार पेरणीचे संकट आमच्यावर आले तर आर्थिक संकट येणार आहे. तसे झाल्यास शासनाकडून रेशनप्रमाणे खते आणि बियाणे मोफत द्यावे, अशी मागणी करावी लागणार आहे.

-सतीष जगताप, शेतकरी.

...

जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित पिकांचा पंचनामा कृषी व महसूल यांनी केला होता. त्याप्रमाणे विमा देण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी केली आहे. ती विम्याची रक्कम जर शेतकऱ्यांना मिळाली तर या परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यामुळे विमा रक्कम तत्काळ देण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

कुलदीप करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीड जिल्हाध्यक्ष.

....

सोयाबीनचा पेरा वाढला

दरवर्षी जिल्ह्यातील कापूस या पिकाची लागवड सर्वाधिक असते. मात्र, खर्चाच्या तुलनेत भाव कमी भेटत असल्यामुळे कापसाचे क्षेत्र घटले आहे. तर सोयाबीनचा पेरा वाढला आहे. यावर्षी कापूस २ लाख २० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली तर, सोयाबीन २ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.

...

कोणत्या तालुक्यात किती पाऊस

तालुका पाऊस पेरणी

मिमी (हेक्टर)

बीड १०८.६ ९४५५३

पाटोदा १४६ ५७५६५

आष्टी १३३.७ ६७३४०

शिरूर १४२ ४०५७३

माजलगाव २७५.७ ५१४९६

गेवराई १८८.९ ८२६३१

धारूर १८० ३८१९३

वडवणी २१७ २४०२१

अंबाजोगाई २७५ ५८६०५

केज १७३ ८५७९७

परळी २५५.६ ४६४२१

030721\03_2_bed_18_03072021_14.jpg

पावसाने ओढ दिल्याने तुषार सिंचनद्वारे पाणी देण्यास सुरुवात