शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा- प्राची कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:14 IST

बीड : शासन नागरिकांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभासाठी या महाशिबीरामध्ये उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलवर ...

ठळक मुद्देवडगाव गुंदा येथे विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्रम

बीड : शासन नागरिकांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभासाठी या महाशिबीरामध्ये उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलवर नागरिकांनी योजनांची माहिती घ्यावी व योजनेस पात्र लाभार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्राची प्र. कुलकर्णी यांनी वडगाव गुंदा येथे आयोजित महाशिबीरात केले.बीड तालुक्यातील वडगाव गुंदा येथे बीड जिल्हा विधीसेवा प्राधिकारणाच्यावतीने महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सदस्य सचिव डी.एन. खडसे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.अजय राख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण राख, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अधिक्षिका उषा रुपदे, सरपंच पंचशिला डोंगरदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.नितीन वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संगिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, डॉ.सुनील भोकरे, उदयसिंह सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हारिदास, उपसरपंच महादेव नागरगोजे, सचिन डोंगरदिवे, अभिमान डोंगरदिवे, अंकुश डोंगरदिवे, द्रोपदी नागरगोजे, सरस्वती लांब, बाबासाहेब नागरगोजे, कमलाबाई नागरगोजे, दादाहरी नागरगोजे, महादेव खेडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिसरातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले की, नागरिकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर नेमण्यात आलेल्या अधिकाºयांची मदत घेतली पाहिजे. गावात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी दरमहा ग्रामसभा घेवून त्या सोडविल्या पाहिजेत, असे सांगितले.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले की, शासन योजनांचा लाभ घ्यावा. प्रत्येक नागरिकांनी कोणतेही काम करताना कायदयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगितले. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.