शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

तहसीलदारांनी केली वाळू माफियांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:06 IST

तालुक्यातील गोदापात्रातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन पकडून तहासीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाजलगावात दोन वाहने पकडली : साडेतीन लाखांचा दंड आकारला

माजलगाव : तालुक्यातील गोदापात्रातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन पकडून तहासीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे.माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातून शेकडो ब्रास वाळूचा उपसा करुन चोरटी वाहतूक केली जाते. तालुक्यातील मंजरथ गोदापात्रातून वाळूची चोरी करुन तालुक्यातील देपेगाव-सांडसचिंचोली शिवारातून वाळूची वाहतूक करण्यात येत होती. ही माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांना मिळाली. त्यानुसार तहसीलदार गोरे व त्यांच्या पथकाने वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जागीच पकडले. विनानंबरच्या या टॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. संबंधित मालकाला १ लाख २७ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली.तर शहरातील भाटवडगाव शिवारात अवैध वाळू उपसा करून त्याची चोरी करून जाणाºया हायवाचा (क्र . एम .एच १४ बी जे १५५५) पाठलाग करत तहसीलदारांनी पकडले. हायवा मालक अमजद मकसुद खान यांच्या या वाहनात ४.३६ ब्रास अवैध वाळू आढळून आली. त्यांना २ लाख १९ हजार रु पये दंडाची नोटीस बजावली आहे.तहसीलदार गोरे यांच्यासह कारवाईत वाळू दक्षता पथक प्रमुख तथा मंडळअधिकारी विकास टाकणखार, तलाठी सोपानराव वाघमारे, मिलमिले यांनी कारवाई केली. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून, कारवाईची धास्तीचे घेतल्याचे चित्र आहे.शिरुरमध्ये एका रात्रीतवाळूचे ३ ट्रॅक्टर जप्तशिरुर : तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील सिंदफना नदीपात्रात प्रभारी तहसीलदार किशोर सानप यांच्या पथकाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून उत्खनन आणि वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर पकडले आहेत.ही कारवाई मंडळ अधिकारी सुरेश पाळवदे,तलाठी,शरद शिंदे, वाहन चालक अमोल रणखांब, अभिमन्यू गाडेकर यांनी केली. ही वाहने तुकाराम आरसुळ यांची असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी जप्त करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत एक लक्ष सत्तावीस हजार रु पयांचा दंड आकारण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडgodavariगोदावरीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग