शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख व्यक्तींना सहव्याधी; तातडीने घ्यावे लागणार उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

बीड : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी माझे कुटुंब माणी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते. यात तब्बल ...

बीड : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी माझे कुटुंब माणी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते. यात तब्बल एक लाख ९ हजार ५१३ लोकांना सहव्याधींचे आजार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या लोकांवर विशेष लक्ष ठेवून त्यांना तातडीने उपचार घ्यावे लागणार आहेत. कोमॉर्बिड आजार असणाऱ्यांनाच कोरोनाचा जास्त धोका असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून समोर आलेले आहे.

जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ६८ हजार २२३ लोकांना सहव्याधी असल्याचे समोर आले होते, तर दुसऱ्या टप्प्यात ४१ हजार २९० लोक समोर आले होते. या सर्वांना संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचार करण्यात आले होते. असे असले तरी काही लोकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे या लोकांनीही आजाराकडे दुर्लक्ष न करता पुढे येऊन उपचार करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दरम्यान, ज्या लोकांना जास्त लक्षणे आहेत, अशांची तत्काळ कोरोना व सारीची चाचणी केली होती. यात पहिल्या टप्प्यात १० हजार ९१६ लोकांची चाचणी केली असता १ हजार ६६३ लोक कोरोनाबाधित आढळले होते, तर दुसऱ्या टप्प्यात २ हजार ६२३ लोकांची चाचणी केली असता ३०३ लोक कोरोनाबाधित आढळले होते. या सर्वांना तातडीने कोरोना केअर सेंटर व जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. ही माेहीम मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका यांनी यशस्वी केली होती.

---ही माेहीम दोन टप्प्यात राबविली होती. कोमॉर्बिड आजार असलेल्यांची माहिती घेतली. गंभीर असलेल्यांना तत्काळ आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तसेच इतरांना वारंवार तपासणी करण्याचा सल्ला दिलेला आहे. आमचे कर्मचारीही संपर्कात आहेत.

डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

---

अशी आहे आकडेवारी

एकूण घरांची संख्या ५,२९,५१८

एकूण लोकसंख्या २६,८४,८८९

सारी/कोरोनाच्या चाचणी १३,४५३

एकूण कोरोनाबाधित १९६६

सहव्याधी असलेले लोक १,०९,५१३

ग्रामीणमधील सहव्याधी ८२,५७६

शहरातील सहव्याधी २६,९३७