शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागावर कारवाईची टांगती तलवार; संचालकांकडून चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:02 IST

लोकमतचा दणका : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा रूग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग कार्यरत आहे.

ठळक मुद्देआरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे यांनी या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. उपसंचालकांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत

- सोमनाथ खताळबीड : जिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील गैरप्रकाराची आरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. लातूरचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांना या पूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून धाबे दणाणले आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा रूग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग कार्यरत आहे. येथे डॉ.सुदाम मोगले या मानसोपचार तज्ज्ञासह चार ते पाच कर्मचारी कार्यरत आहेत. परंतू मागीत तीन वर्षात त्यांनी ३८८ पैकी केवळ५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना भेट दिली. तसेच समुपदेशन व इतर कारणांच्या नावाखाली वाहनांवर तब्बल १२ लाख ६३ हजार रूपयांची उधळपट्टी केली होती. हा सर्व प्रकार 'लोकमत'ने शुक्रवारी चव्हाट्यावर आणला.त्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. राज्याच्य आरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे यांनी या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच उपसंचालकांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - बीड जिल्हा रूग्णालयात रेमडेसिवीरचा काळाबाजार; इंजेक्शन दिले एक अन् नोंद पाचची

विभाग प्रमुखांवर कारवाईप्रकल्प प्रेरणा विभागाचे प्रमुख मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले आहेत. परंतू ते कायम गायब असतात. दोन दिवसांपासून विनापरवानगी दांडी मारल्याने त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाईही झाली आहे. यावरून त्यांच्या कामचुकारपणाला दुजाेरा मिळाला आहे. डॉ.मोगले यांच्या स्वाक्षरीनेचे हे१२ लाख रूपये उधळण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांकडे तक्रारया सर्व प्रकाराची सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री, आरोग्य आयुक्त, सचिव, संचालक, उपसंचालक या सर्वांकडे नावानिशी तक्रार केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याची दखल घेऊन संबंधिताला कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. 

बीडमधील प्रकार गंभीर आहे. या पूर्ण प्रकाराची चौकशी करण्याच्या सुचना उपसंचालक व सीएसला देते. दोषींवर कारवाई केली जाईल.- डॉ.साधना तायडे, संचालिका, आरोग्य विभाग

बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागाबद्दल चौकशीच्या सुचना संचालकांकडून मिळाल्या आहेत. लवकरच कारवाई केली जाईल.- डॉ.एकनाथ माले, उपसंचालक, लातूर

हेही वाचा - 'लाखो रूपये वेतन घेणारे डॉक्टर पुन्हा गायब'; बीड जिल्हा शल्यचिकित्सकांचा वचक दिसेना

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टर