शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी स्वाराती रुग्णालय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

लोकमत संवाद अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी येथील स्वामी रामानंद तीर्थ ...

लोकमत संवाद

अविनाश मुडेगावकर/

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सर्व सोयी व सुविधांनी सज्ज झाले आहे. रुग्णालयात एकाच वेळी ५०० रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने दर्जेदार उपचार होतील, अशी सर्व सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १७९१ रुग्णांवर, तर दुसऱ्या लाटेत ३११२ अशा ४९०६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात राहिली. दुसऱ्या लाटेत रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड कमी पडले. अनेक वेळा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. मात्र, त्याही परिस्थितीत ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. हे काम मोठ्या जिकिरीचे व धावपळीचे होते. मात्र, आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करताना जुन्या सर्व त्रुटी दूर करून यंत्रसामग्रीची परिपूर्ण पूर्तता करण्यात आली आहे. रुग्णालयात एकाच वेळी ५०० कोरोनाच्या रुग्णांवर योग्य उपचार होतील, अशी सर्व व्यवस्था रुग्णालय प्रशासनाने केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

...

नवीन ७४ मल्टिपॅरा मॉनिटर

तिसऱ्या लाटेत लहान मुलांचा समावेश असेल, अशी शक्यता वर्तविण्यात आल्याने लहान मुलांसाठी स्वतंत्र आयसीयू कक्ष स्थापन करण्यात आला आहे. २५ व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर, पूर्वी जनरल आयसीयूमध्ये असणाऱ्या व्हेंटिलेटरला मॉनिटर सिस्टिम नसल्याने उपचार करताना डॉक्टरांना मोठे अडथळे निर्माण होत होते. मात्र, आता नवीन ७४ मल्टिपॅरा मॉनिटर मुख्यमंत्री निधीतून उपलब्ध झाले आहेत. रुग्णालयातील व्हेंटिलेटरची संख्या १०२ वर जाऊन पोहोचली आहे. तर, २३० ऑक्सिजन बेडच्या निर्मितीचे काम सुरू आहे, असेही डाॅ. सुक्रे यांनी सांगितले.

...

२८८ जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती करणार

पूर्वी रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्रकल्प सुरू होते. यातील एक प्रकल्प हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करतो. त्या प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा आवाज येत असे. मात्र, त्याची दुरुस्ती होऊन तो प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने २८८ जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती करणार आहे. तर, नवीन १३ के.एल.च्या ऑक्सिजन टँकला मंजुरी मिळाली असून हे काम लवकर पूर्ण होईल. नवीन ५०० जम्बो सिलिंडर घेण्यात येणार आहेत. लहान मुले व इतर रुग्णांना कोणतीही औषधे, इंजेक्शन यांचा तुटवडा भासू नये, यासाठी लहान मुलांना लागणारे आयव्हीआयजी, तर मोठ्यांसाठी लागणा-या रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा व विविध औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे मृत्युदर वाढला, तो कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

...

लसीकरण व मास्क बंधनकारकच

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोना झाला, तरी त्याची तीव्रता जाणवत नाही. मास्कचा नियमित वापर केल्यास कोरोनापासून ९७ टक्के बचाव होतो. यासाठी मास्कचा वापर सक्तीने झालाच पाहिजे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, या नियमांचे पालन झाल्यास तिसरी लाट रोखणे अवघड नाही. यासाठी नियमांचे पालन करा, असे आवाहनही डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले आहे.

310721\img-20210730-wa0073.jpg

अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे