शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा सोबती बनला ‘स्वाध्याय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने राज्य शासनाने राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ...

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने राज्य शासनाने राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ‘स्वाध्याय’ (डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रम सुरू केला. या उपक्रमात बीड जिल्हा राज्यात १४व्या स्थानी आहे. जिल्ह्यातील एक लाख १५ हजार ९०२ विद्यार्थी स्वाध्याय सोडवत असून, बहुपर्यायी उत्तरांमुळे या प्रश्नमंजूषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण वाढले आहे.

या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मोबाइलवर 'क्विझ' (प्रश्नमंजूषा) पाठविण्यात येते. त्याच्या उपयोगातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्य:स्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतात.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानवाढीसाठी शासनाचा व्हाॅट्सॲप आधारित सराव हा अभिनव उपक्रम असून, राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषदेच्या प्रयत्नांना चांगले यश आल्याचे दिसते.

फोनवर प्रश्नमंजूषा व त्याची उत्तरे सोडविताना विद्यार्थ्यांना उत्सुकता असते त्याचबरोबर दिलेल्या उत्तराची पडताळणी करताना कुतूहलही असते. कोरोनाकाळात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’वर अभ्यास सुरू आहे.

एकूण विद्यार्थी : ५, १३, ५८०

स्वाध्यायसाठी जिल्ह्यात नोंदणी केलेले विद्यार्थी : १,५२,५९४

मराठी : १३,९१७

इंग्रजी : २४,०६०

उर्दू : १४,०७७

एकूण : १,५२,५९४

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी : १,४८,८९६

मराठी : १११६४७

इंग्रजी : २३४०३

उर्दू : १३८४६

एकूण : १,४८, ८९६

--------

सुलभ आणि सोपे स्वाध्याय

यामध्ये मराठी, गणित व विज्ञान या विषयांचे स्वाध्याय दर शनिवार, रविवारी व्हाॅट‌्सॲपवर सराव म्हणून सोडवण्यासाठी येतात. हे स्वाध्याय सोडवल्यानंतर लगेच किती मार्क पडले ते कळते व त्याबाबतची उत्तरसूचीसुद्धा मेसेजद्वारे येते, जर कमी मार्क पडले असतील तर त्या प्रश्नांच्या अनुषंगाने माहिती असलेला दीक्षा ॲपवरील व्हिडिओची लिंक दिलेली असते. त्यामुळे तो व्हिडिओ पाहून पुन्हा त्या विषयाचा सखोल अभ्यास होतो.

------------

स्वाध्याय उपक्रम हा अतिशय चांगला उपक्रम आहे. मला यामुळे या उपक्रमाबाबत खूप आवड निर्माण झाली आहे, तसेच मी दर आठवड्याला या स्वाध्यायाची आतुरतेने वाट पाहत असते. उत्तरसूची मिळते, त्यामुळे कमी मार्क कोणत्या प्रश्नाला पडले व त्याचे उत्तर काय हे कळते.

यशश्री राहुल चाटे, इयत्ता चौथी

---------

स्वाध्याय उपक्रम मला सुरुवातीपासूनच आवडतो. सराव होतो. आनंद वाटतो. प्रश्न आल्यानंतर लगेच सोडविण्यासठी माझी तयारी असते. उत्तरांचे पर्याय असतात. कोडे सोडविल्यासारखे ते मी सोडवतो. कुठे चुकले ते उत्तरसूचीमुळे समजते. - समर्थ भगीरथ करपे, इयत्ता सातवी, जिल्हा परिषद प्र. शाळा कुमशी, ता. जि. बीड.

----------

बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद सीईओंच्या मार्गदर्शनात स्वाध्याय उपक्रम राबविला जात आहे. शिक्षकांकडून चांगले योगदान मिळत असल्याने सध्या बीड जिल्हा चौदाव्या स्थानी आहे. २५ मार्च रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक होऊन प्रत्येक पालकांपर्यंत स्वाध्याय पोहोचविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पहिला यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - जयपाल कांबळे, प्रभारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई.

------------

===Photopath===

300321\30bed_5_30032021_14.jpg~300321\30bed_6_30032021_14.jpg

===Caption===

यशश्री चाटे~समर्थ करपे