शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तलवाडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ‘बोंब मारो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

गेवराई : खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने केलेले नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार सरसकट शेतकऱ्यांना ...

गेवराई : खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने केलेले नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार सरसकट शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य पूजा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात मागील वर्षी खरीप हंगामातील ७ लाख ४९ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला होता. यापैकी ६ लाख २५ हजार ६३५ हेक्‍टर क्षेत्राचा विमा १७ लाख ९५ हजार ५५२ शेतकऱ्यांनी उतरवला होता. नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसानभरपाईपोटी कंपन्यांकडून लाभ दिला जातो. खरीप हंगामातील पिके काढणीला आली असता जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. त्यांतर शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले. मात्र विमा कंपनीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे आंदोलकांच्या वतीने तहसीलदार सचिन खाडे, विमा जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब इनकर, तालुका कृषी अधिकारी बी. टी. सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पूजा मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर, रोशन देशमुख, करण धूमक, किशोर इंगोले, सुंदर तिवारी, प्रा. श्याम कुंड, परमेश्वर मिंड, गणेश मोरे, राहुल मराठे, आसाराम मराठे, शहेंशहा सौदागर, सखाराम आखरे सह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

प्रशासनाचे पंचनामे कृषी विभागाने ग्राह्य धरावे

कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त समितीने नुकसानभरपाईसाठी पंचनामे केले. यामध्ये २ लाख ५५ हजार ७१० हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानुसार ३ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.

परंतु पीक विमा कंपनीकडून नुकसान झालेले हे क्षेत्र ग्राह्य धरण्यात आलेले नाही. त्यांच्या अहवालानुसार फक्त १९ हजार ३४४ शेतकरी सभासदांना नुकसानभरपाई मिळणार असून, त्यापोटी १२ कोटी १९ लाख रुपयांची बोळवण केली जाणार आहे. त्यामुळे अडचणीत आलेला शेतकरी हवालदिल झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले.

===Photopath===

190621\sakharam shinde_img-20210619-wa0042_14.jpg