प्रा.शा. गवळवाडी, ता. बीड
बीड : तालुक्यातील गवळवाडी येथे मंगळवारी संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच गंगासागर मस्के, उपसरपंच गीता मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सखाराम मस्के, तसेच बाबासाहेब मस्के, हनुमान मस्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माउली दातांचा दवाखाना, बीड
बीड : शहरातील माउली दातांचा दवाखाना येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. प्रवीण ढगे, डॉ. शीतल ढगे, रोहिदास ढगे, अन्वर पटेल, डॉ. आयेशा शेख, डॉ. शिल्पा घुले, डॉ. ज्योती खाडे, डॉ. प्रियंका पाटील, सागर घोडके, सुरेखा देवधरे, खुशी, शंभुराजे, शुभांगी राऊत, प्रिया जोगदंड, मनीषा पाठक आदी उपस्थित होते.
बीड शहर पोलीस ठाणे
बीड : येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोनि. रिव सानप, सपोनि. घनश्याम अंतरप यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. पोना. संजय राठोड, रामराव आघाव, अशोक दराडे, पोह. रामदास तांदळे, बाबुशा जाधव, सुरेश घोरपडे, पोकाँ सय्यद अशपाक, मपोशि शीतल काकडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
ग्रामीण पोलीस ठाणे, बीड
बीड : येथे जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सपोनि. योगेश उबाळे, पोउपनि. राजपूत, पोना गंगाराम घोडके, तानाजी डोईफोडे, दिनेश ढाकणे, किशोर राऊत आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती.