शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

संशयकल्लोळ, करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:40 IST

बीड: करुणा शर्मा यांच्या परळी दौऱ्यातील नाट्यमय घडामोडींचा दुसरा अंक ६ सप्टेंबर रोजी पाहावयास मिळाला. त्यांच्यावर दाखल ...

बीड: करुणा शर्मा यांच्या परळी दौऱ्यातील नाट्यमय घडामोडींचा दुसरा अंक ६ सप्टेंबर रोजी पाहावयास मिळाला. त्यांच्यावर दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यानंतर गाडीत आढळलेल्या पिस्तूलवरून चालकालाही अटक करण्यात आली. याचवेळी एक व्यक्ती संशयास्पद वस्तू त्यांच्या गाडीतील डिकीत ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे हे पिस्तूल आधीच गाडीत होते की, ठेवले होते हे गूढ कायम आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांची अंबाजोगाई न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी ६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन करुणा शर्मा प्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. वैद्यनाथ मंदिरासमोर जमावाने त्यांना रोखले तेव्हा काही महिलांनी आम्ही वेगवेगळ्या जाती-समूहाच्या असून, धनंजय मुंडे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर तुम्ही बेछूट आरोप करू नका, असे म्हटले. यावेळी करुणा यांनी जातिवाचक शिवीगाळ केली, तर त्यांच्या सोबतच्या अरुण मोरे याने बेबी तांबोळी या महिलेवर चाकूहल्ला केला. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राआधारे विशाखा घाडगे यांच्या फिर्यादीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्याविरोधात ॲट्राॅसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे शर्मा यांच्या गाडीत आढळलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून, यावरून चालक दिलीप पंडित (रा. अंधेरी)विरोधात बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला अटक केली असल्याची माहिती अधीक्षक राजा यांनी दिली.

दरम्यान, गाडीच्या डिक्कीत संशयास्पद वस्तू ठेवताना एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. करुणा शर्मा यांच्या तक्रारीवरून बेकायदेशीर गर्दी केल्याने कोविड नियमांचा भंग केल्याचा गुन्हा शंभर ते दोनशे जणांवर करण्यात आला. पोलिसांकडून निष्काळजी झाली असेल तर चौकशी केली जाईल, असा इशारा अधीक्षक आर. राजा यांनी दिला.

...

न्यायालयात स्वत:च मांडली बाजू

करुणा शर्मा व अरुण मोरे यांना ६ रोजी सकाळी अंबाजोगाई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. करुणा यांनी स्वत:च बाजू मांडून आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला. न्यायालयाने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली, तर अरुण मोरेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.