शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार अधिकाऱ्यांना दणका ! मृतदेहाची हेळसांड प्रकरणात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 16:14 IST

'लोकमत'चा दणका; शेतकऱ्याच्या मृतदेहाची तब्बल १५ तास हेळसांड झाल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला होता

- सोमनाथ खताळबीड : वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अपघातील मयत झालेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहाची तब्बल १५ तास हेळसांड झाली होती. या प्रकरणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार 'लोकमत'ने उघड केला होता. त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबणासाठी अख्खे कुप्पा गाव एकवटले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला होता. 

याप्रकरणाची आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त एन.रामास्वामी संचालिक डॉ.साधना तायडे आणि उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी गंभीर दखल घेतली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे, साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे, संदीपान मांडवे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. 

यात आयुक्तांनी कुप्पा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजूश्री दुल्लरवार व डॉ.शितल जाधव यांचे निलंबन करण्याचे आदेश उपसंचालकांना दिले. त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी उपसंचालक कार्यालयातून या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबण झाल्याचा अहवाल बीड आरोग्य विभागाला दिला आहे. याकारवाईने डॉक्टर मुख्यालयी राहुन सेवा देत नसल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. --