शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत पथकाची ‘निगराणी’; कारमध्ये आढळले एक कोटी रुपये

By शिरीष शिंदे | Updated: May 4, 2024 23:26 IST

सदरील रोकड जप्त करुन कोषागार विभागाकडे देण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेवराई (जि.बीड) : तालुक्यातील खामगाव येथील निगरानी पथकास तपासणी करताना एका कारमध्ये तब्बल एक कोटी रुपये आढळून आले. हा प्रकार ७.३० च्या सुमारास उघडकीस आला. सदरील रोकड जप्त करुन कोषागार विभागाकडे देण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.छत्रपती संभाजी नगरवरुन येणारी कार क्रमांक एमएच-२३ एडी-०३६६ ची तपासणी खामगाव येथील एसएसटी पथकाने केली असता त्यामध्ये एक लोखंडी पेटी आढळून आली. सदरील पेटी उघडली असता त्यामध्ये एक कोटी रुपये आढळून आले. याबाबतची माहिती अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदिप खोमणे व पोलिस निरिक्षक प्रविणकुमार बांगर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळास भेट दिली. वाहन चालकास सदरील रकमेबाबत माहिती विचारली असता ही एक कोटी रुपये बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची आहे.छत्रपती संभाजी नगर मंत्री बँकच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे सांगण्यात आले. कारमध्ये तीनजण होते असे सूत्रांनी सांगितले. सदरील रकमेच्या वाहतुकीबाबत निवडणूक आयोगाच्या इएमएमएसएद्वारे जनरेट झालेला बारकोड नव्हता. परंतु त्यांच्याकडे संभाजी नगर येथून परवानगी पत्र होत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सदरील रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. सदरील घटनेचा पंचनामा पथक प्रमुख महेश मेटे यांनी करुन पुढील कारवाईसाठी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांसोबतच काशिनाथ माने, शरद मिसाळ, धीजर खांडेकर यांचाही सहभाग होता.तपासणी करुन रक्कम दिली जाणार परत -१० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्याने जप्त करण्यात आलेली रक्कम ही कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त केली जाईल. त्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजी नगर येथील बँकच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती की नाही याची माहिती घेतील. त्यात तथ्य आढळून आले तर सदरील एक कोटी रुपयांची रक्कम परत दिली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Beedबीड